www.Udyogtoall.Com

 

-

संस्थेची स्थापना :.


अ] . संस्था नोंदणी : संस्था नोंदणी अधिनियम १८६० नोंदणी क्र. : महाराष्ट्र / २१५८  ..दि. ३ सप्टेंबर, १९८७ .
ब]
.पब्लिक ट्रस्ट अक्ट १९५० नोंदणी क्र . : एफ / २०८६ .. दि. १ जानेवारी, १९८८. अन्वये महाराष्ट्र शासना कडे झाली आहे.

 

संस्थेचा मुख्यउद्देश :

चामुंडा माता प्रशिक्षण संस्था ,अशासकीय नोंदणीकृत संस्था असून, गेल्या 30 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वयंरोजगार विकास क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग , ग्रामीण विकास विभाग , नागरी विकास विभाग , आदिवासी विकास विभाग , समाजकल्याण विभाग , अल्पसंख्याक विभाग, ग्रामोद्योग विभाग कृषी विभाग , कामगार कल्याण विभाग , युवक कल्याण विभाग , महिला व बाल कल्याण विभाग , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग , मानवी संसाधन विकास विभाग इत्यादी शासकीय संस्थातर्फे प्रायोजित स्वयंरोजगार व कौशल्य वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन संस्थेतर्फे केले जाते . उद्योजगता , स्वयंमूल्यमापन , व्यक्तिमत्व विकास , प्रेरणा व कार्यसिद्धी , वेळ , स्थळ व काळाचे व्यवस्थापन , उद्योग उभारणी, उद्योग विषयक कायदे इत्यादी सह विविध वस्तू बनविण्याची प्रक्रिया, कच्चा माल , मशिनरी , प्रकल्प आहवाल , मार्केटिंग कौशल्य , उद्योगांच्या छापील नोटस व प्रशिक्षण प्रमाणपत्र इत्यादींचा प्रशिक्षणात समावेश आहे.

 

  •